गझल : आश्रुबा कोठावळे

 



१.

दुःखाला मी सोडत नाही वाऱ्यावरती
सुखास आता थारा नाही आल्यावरती

हासत हासत समोर जातो अनेक वेळा
संकट आले किती जरी ही माझ्यावरती

माहेराच्या आठवणी त्या ओव्यांमध्ये
माझी आजी रोज गायची जात्यावरती

पोटाची या खळगी भरण्या शिकार करतो  
बगळा आता टपून बसतो पाण्यावरती

मायेच्या पाखरास आता जपण्यासाठी
विश्वास जरा ठेवू आपण नात्यावरती

मित्रांसोबत कधीतरी मी थोडी घेतो
कधी बायको माहेराला गेल्यावरती

.................................
आश्रुबा कोठावळे
कळंब जि.धाराशिव
9403391734

No comments:

Post a Comment