१.
भेटणे होणार नाही यापुढे आता
निवडल्या आहेत आपण वेगळ्या वाटा
टाकले फासे किती डोहात प्रेमाच्या
लागला नाही गळाला एकही मासा
काळजाला ज्या फुलाचा मोह झालेला
त्या फुलाचा काळजाला टोचला काटा
फार सवयीचे कुणी होऊ नये इतके
त्रास होतो ‘शेवटी’... सोडून जाताना
फार सांभाळून द्यावा शब्द देतांना
जन्मभर सलतो दिलेला शब्द एखादा
मी असा शापित किनारा या समुद्राचा
बिलगल्या आहेत केवळ कोरड्या लाटा
२.
तापत आहे नाते म्हणजे जळणे आले बोलुन गेल्यानंतर मग हळहळणे आले
उंचीवरती दोस्ता इतकी गंमत नाही वरती गेलो म्हणजे खाली पडणे आले
गझल कविता लिहीणे इतके सोपे नसते जखमा कोरत बसलो की भळभळणे आले
एका पराभवाने काही बिघडत नसते चालत आहे तर नक्की अडखळणे आले
एका जागी थांबलोच तर सडतो आपण नदीसारखे म्हणून मग खळखळणे आले
दुसरी छान !!!
ReplyDeleteपहिल्या गझलेत एक कवाफीचे वेगळेपण आहे. गैरमुरद्दफ गझलेत सर्व शेरांतील काफियात सवलत घेण्यात आली आहे. स्थिर अक्षर नाही. दुसरी गझल सुंदर आहे. टायपिंगमध्ये ओळी एकत्र झाल्या आहेत.
ReplyDelete