१.
कुठे पुरेसा विकास झाला?
मनास नुसताच भास झाला
शहर वसवले चकाकणारे
अखेर वाडा भकास झाला
बरीच आशा उरात होती
बघून गावे उदास झाला
शिकून मोठा हुशार तू रे!
गुलाम का नव ग्रहास झाला?
कमावती सून ती जरीही
घरात सासूरवास झाला
फकीर त्याला कसे म्हणावे?
अखेर लोभी धनास झाला
समानतेचा अभाव येथे
बराच खडतर प्रवास झाला.
२.
सावध जरी मी तात्काळ झालो
धोकाधडीने घायाळ झालो
झालेत वैरी,अपुलेच आता
शब्दांत काटे, सायाळ झालो
हिसकावल्यावर अधिकार माझे
आंदोलनाने विक्राळ झालो
धास्तीत जगलो दादागिरीच्या
मी शेवटाला नाठाळ झालो
डरकाळतो बघ क्रांतीस आता
पंचाननाची आयाळ झालो
काटेच आले वाट्यास माझ्या
फुलपाखरू मी, ओढाळ झालो
दुष्काळ येथे सद्भावनेचा
मी काळजाने आभाळ झालो
................................
प्रवीण सु.चांदोरे(सुधांशु)
नेर परसोपंत
मो.9423663869 Whatsapp:8308017982
No comments:
Post a Comment