१.
साधना जिच्यामुळेच लागलो करायला
साधनेत खंड नेमका तिनेच पाडला
राजकारणात तोच तग धरून राहिला
लाच घेत, भ्रष्ट होत जो सदैव चालला
शब्दघाव घालुनी क्षणात तोडले हृदय
आप्त जोडण्यास मी उगाच जीव जाळला
वागण्यात तारतम्य ठेवलेस तू कधी?
मान मिळविण्यास लागतो 'अहंं' गिळायला
लागली शिरायला घरामधेच संकटे
ओसरी दिलीस तूच पाय पसरवायला
२.
खुशाल सांग तू मला तुझी नवीन कारणे
जमेल का तुला कधी मला खरेच टाळणे?
मला जमायला हवे अता जपून बोलणे
नको तुझे असे सुतावरून स्वर्ग गाठणे
कशास पाहिजे कट्यार जीव घ्यायला तुला
पुरेल फक्त एकदा तुझे वळून पाहणे
शिकून लेक चालली कठीण मार्ग केवढा
बरे नव्हे असे तिचे उगाच पाय खेचणे
किमान एकदा पुन्हा विचार तू करून बघ
मिळेल एक शक्यता जमेल बंध जोडणे
किती दिवस पहायची अजून वाट मी तुझी?
मला कधी कळेल हे तुझे तुझ्यात राहणे?
जुनेच रंग वापरून चित्र काढले नवे
शिकायलाच पाहिजे अचूक मेळ साधणे
३.
सत्य की आभास आहे? हे मनाशी युद्ध आहे
आतला आवाज ज्याने ऐकला तो बुद्ध आहे
बाटलेला देह बाजारात फिरते घेउनी ती
पण मनावर प्रेम करणारे तिचे मन शुद्ध आहे
द्यायचा साधू जगाला शांततेचे पाठ मोठे
ऐकल्यावर दोष अपुले तो जगावर क्रुद्ध आहे
भ्रष्ट होउन लाख रांजण वैभवाचे ठेवलेले
शील चारित्र्यास जपणारा खरा समृद्ध आहे
लागते द्यावेच काही नाव नात्याला इथेही
माहिती आहे तरी की वागणे परिशुद्ध आहे
..............................................
सौ.अंजली आशुतोष मराठे,
बडोदे, गुजरात
9725022510
सर्व गझल खूप सुंदर आहेत अंजली. अशीच लिहीत रहा
ReplyDeleteखूप आभार वैशाली 🙏
Deleteवाह... वाह.. खूप सुंदर 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteखूप आभार 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतिन्ही गजल खूपच छान लिहिल्या आहेस.👌👍
ReplyDeleteGod Bless you ❤️
धन्यवाद नंदकिशोर 🙏
Deleteवाह!! सुरेख गझल तीनही!! शेवटची जास्त आवडली , तुला खूप खूप शुभेच्छा!! असंच भरपूर लिही
ReplyDeleteखूप आभार 🙏
Deleteवाह सुंदर गझल ताई, अभिनंदन 💐💐
ReplyDeleteखूप थँक्यू 🙏
ReplyDelete