दोन गझला : रोशनकुमार पिलेवान

 



१.

केवढा वनवास आहे जिंदगी 
ही तरीही खास आहे जिंदगी 

प्रश्न दोराला विचारी झाड हे 
का असा गळफास आहे जिंदगी ? 

संशयाला भीक तू घालू  नको
शेवटी विश्वास आहे जिंदगी 

का उद्याची स्वप्न चित्रे आखतो 
पूर्तिचा अदमास आहे जिंदगी 

हा तुझा श्रृंगार पाहुन  वाटते 
बिल्वरी आरास आहे जिंदगी 

पुस्तकातिल मोरपंखी आठवे 
हा जुना इतिहास आहे जिंदगी 

२.

पुन्हा एकदा वार पाठीत या
पुन्हा सांडले रक्त मातीत या

नको ना दगा यार देऊ अता
उभा वार घेण्यास छातीत या

मला कीव येते तुझी मानवा
किती  रंग धर्मात,जातीत या

विठू ये तुही त्रास घे ना जरा
कधीचा उभा मीच बारीत या

मनीपूर नाही इथे एकटा
उभा देश जळतोय आगीत या

................................
रोशनकुमार शामजी पिलेवान
मु.पो. ता .खानापूर जि . सांगली
पिन 415307
मो. 7798509816

No comments:

Post a Comment