१.
एक नवरी छान सजते रोज रात्री
एक विधवा फक्त रडते रोज रात्री
जी भुकेचे छानपैकी सोंग करते
का तिलाही पोट डसते रोज रात्री
दर सकाळी रोज मजला भेटते सुख
प्रार्थना 'ती' कोण करते रोज रात्री
लेकरांची भूक शमवूनी बिचारी
देह जाळायास बसते रोज रात्री
ती प्रकाशाला कशी देते इशारा
जी तमाशी लढत असते रोज रात्री
२.
बेमतला गझल
जर भेटलीस तू तर लांबून जा जराशी
मागून प्रेयसीला इतकेच मी म्हणालो
आहे कितीक बाकी सांगू कसे कुणाला
तितकाच राहिलो मी जितका तुला कळालो
काहीच होत नाही प्रेमात हारल्यावर
समजून हे खरे मी आता परत निघालो
दिसलोच मी कधी तर पाहून हासते ती
पाहून खुश तिला मी आलो निघून आलो
प्रेमात मी कुणाच्या पडणार ना कधीही
होणार मी कुणाचा जेव्हा तुझा न झालो
.................................
✍️चेतन पवार,बुलडाणा
मो.नं. 9604242334
No comments:
Post a Comment