तीन गझला : शोभा वागळे

 



१.

फुलांसवे फुलायचे मनात आहे
मुलांत मी रमायचे मनात आहे.

उगी कुणा नको अता दुखावयाला
मने अता जपायचे मनात आहे.

मनामनांत प्रीत जोडुया नव्याने
प्रितीत मी जगायचे मनात आहे.

जरा असेच लाजणे मनास वाटे
तसेच मी नटायचे मनात आहे.

कितीक घाव सोसले जरी मनाने
तरी मनी हसायचे मनात आहे.

किती तुझ्यात गुंतले मला कळेना
हळूहळू सुटायचे मनात आहे.

जुन्याच आठवांस मी किती उगाळू?
नको अता रडायचे मनात आहे.

२.

फुलांसारखे जीवन असणे फार बरे
गंध जगाला देत राहणे फार बरे

ज्योत दिव्याची थेंब-थेंब तेवत असते
दुसऱ्यांसाठी सदैव खपणे फार बरे

गोड बोलुनी  हरणेही मंजूर मला
गोड बोलुनी मने जिंकणे फार बरे

कटू बोलुनी नको दुखावू कोणाला
मन आनंदी सदा राखणे फार बरे

नुसते कौतुक लाड मुलांचे बरे नव्हे
शिस्त मुलांना रोज लावणे फार बरे.

३.

पाण्यावर वा खडकावरती फुलता येते
आयुष्याच्या मार्गावरती फुलता येते

काय बिघडले रुजण्यासाठी माती नव्हती
रस्त्यावरच्या काट्यावरती फुलता येते

मत्सर अन् द्वेषाने कुस्कर- बिस्करले पण
नात्यांमधल्या स्नेहावरती फुलता येते

सत्कर्माचा मार्ग धरावा मनशांतीचा
शांतशांतशा वाऱ्यावरती फुलता येते

सर्वधर्म समभाव राखते,धर्म पाळते
समतेच्याही रानावरती फुलता येते.

.................................
शोभा वागळे
मुंबई.
8859466717

1 comment: