१.
कधी नार मोहक अशी भासशी तू
जरी हातचेही हसू राखशी तू
सुखी जीवनाची अशी बघत स्वप्ने
किती रात्र माझ्यासवे जागशी तू
नभातील तारे,फुलांचे फुलोरे
तुला सर्व द्यावे जरी मागशी तू
तुझ्या चेहऱ्यावर हसू गोड आहे
कशाला अशी मग कुढत राहशी तू
अबोलीप्रमाणे मुक्याने रहाशी
घरी रोज परक्यापरी वागशी तू
२.
ही जखम काळजाची भरणार ना कधी
सल चेहऱ्यावरी तुज दिसणार ना कधी
तू सोडता मला मी खचले जरी कधी
फिरुनी तुझ्या घराशी वळणार ना कधी
संसार मांडुनी मी रमले नव्या जगी
ती प्रीत कालची बघ जडणार ना कधी
ओठी सजेल हासू हे वचन तुज दिले
डोळ्यातलेच अश्रू पडणार ना कधी
मिळतील लाख तुजला आधार सांगण्या
लाखात प्रीतवेडी मिळणार ना कधी
.................................
स्मिता अमित हर्डीकर
नेरूळ
8779034610
नभातील तारे, फुलांचे फुलोरे...हा मिसरा आवडला. तसेच, लाखात प्रीतवेडी...हाही मिसरा आवडला. - केदार पाटणकर
ReplyDelete