१.
मातीत भारताच्या सन्मान लाभलेला
सर्वत्र स्वाभिमानी उत्कर्ष भारलेला
देशात पेटलेले शूरत्व क्रांतिकारी
चौफेर जिंकणारा विश्वास दाटलेला
रक्तात वाढलेले पौरुष्य धैर्यशाली
शत्रूस देत शिक्षा झेंड्यास भावलेला
प्रेमात नांदती हे हातात हात सारे
घेऊन ठाम बाणा राष्ट्रास बांधलेला
विज्ञान तंत्रज्ञानी पाऊल चांद्रयानी
विश्वात नाम श्रेष्ठी चंद्रास गाठलेला
२.
प्रिया जीवनाची सदा साथ होती
प्रसंगात वेळेवरी मात होती
मनाच्या अथांगी तिला पाहिले मी
नवे गीत माझे स्वये गात होती
गुणी-ज्ञात देवी जणू चंदनाची
जिवाची शिदोरी मला यात होती
खरी देवता ही कृतार्थी विवेकी
गृहाची उभारी भले हात होती
घरातील स्फूर्ती जशी दीपनंदा
सदा तेवणारी अशी वात होती
................................
सुधाकर झिंगाडे,उमरगा
८७९९९२३२९८
No comments:
Post a Comment