१.
जो काल होता तो आज नाही
कोठे कुणाचा आवाज नाही
खोटे पवाडे गावे कुणाचे
माझ्या मनाचा तो बाज नाही
छेडून जाव्या तारा व्यथांच्या
इथल्या सुरांना तो साज नाही
चाहूल थोडी घेशील तूही
इथल्या फुलांनाही लाज नाही
काही दिसेना काही कळेना
येथे कशाचा अंदाज नाही
२
संपला राम अन् वाचली माकडे
केवढी ही पहा माजली माकडे
पेटले गाव हे, पेट घेती घरे
पाहुनी आग ही नाचली माकडे
अंबरीचा कुणी सूर्य ना पाहिला
मात्र साऱ्या जगी गाजली माकडे
माणसांना रडू कोसळू लागले
फक्त गावातली हासली माकडे
काल जी बांधती, सेतु लंकेपरी
आज सिंहासनी बैसली माकडे
.................................
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
No comments:
Post a Comment