१.
तू दिव्यासारखी जाळली जिंदगी
धूर होऊन सांभाळली जिंदगी
काय भेटू तुला वेदने आणखी
तू उन्हासारखी टाळली जिंदगी
भाग्य अपुले करंटे असे समजुनी
मी मुलीसारखी माळली जिंदगी
लोक पुसतात मजला खुशाली तुझी
काय सांगू कुठे भाळली जिंदगी
तू न आली परत भेटण्या-बोलण्या
मी तरी मात्र सांभाळली जिंदगी
ते दिवस मोरपंखी हरवले कुठे?
मी उपाशीच कुरवाळली जिंदगी
२.
तुटल्यावरती जुळणे नाही
पुन्हा मनसोक्त जगणे नाही
ह्या प्रेमाची भूक भयंकर
खा किती पोट भरणे नाही
एकतर्फी कहाणी म्हणजे
डोळे असून बघणे नाही
आयुष्य सरत जाते सगळे
सरल्याशिवाय कळणे नाही.
वाटेवरती हात सोडला
त्या वाटेवर रडणे नाही
जखमा ऐशा हव्याहव्याशा
बरे होऊन हसणे नाही
एकांताचा रस्ता म्हणजे
चालत जाणे फिरणे नाही
३.
आनंदाने हसता आले नाही
मनाप्रमाणे जगता आले नाही
धावत होतो मी सदैव दिवस रात्र
घडीभर शांत बसता आले नाही
हवे तसे जगलीस तू जरी येथे
मला तसे ते करता आले नाही
हुलकावणी दिली नशिबाने मजला
त्याला दोषी धरता आले नाही
लपंडाव खेळत आहे यश अजुनी
त्यास मजला पकडता आले नाही
मनात मेल्या अनेक इच्छा माझ्या
जिवंत त्यांना करता आले नाही
ध्येय गाठले निराश झालो नाही
मागे मजला सरता आले नाही
No comments:
Post a Comment