सांग आता मी कशावर काय बोलू?
तोंड माझे दाबल्यावर काय बोलू?
भावना जपल्या तुझ्या मी हर घडीला
तू दिलेल्या यातनावर काय बोलू?
पाळली वचने तुझी मी कितीदा
बदललेल्या चेहऱ्यावर काय बोलू?
आठवांनी चिंब झाले मन जरासे
गोठलेल्या या मनावर काय बोलू?
कोंडले मी शब्द आता मौन होउन
का उगीचच जीवनावर काय बोलू?
.................................................
आलीयागोहर जाकीर शेख, धुळे
No comments:
Post a Comment