१.
तसाही फार मोठा काळ ना टिकला अबोला
तुलाही वाजली थंडी तसा मिटला अबोला
कसे सांगू किती हा जीव जडलेला तुझ्यावर
तुला दिसले कुठे हे प्रेम?बस दिसला अबोला
मिटवले ज्या क्षणी मी ओठ ओठांनी जरासे
किती ते गाल खुलले अन् किती खुलला अबोला
कुठे गेले कुणा ठावे सततचे चॅट अपुले
अता उरल्यात केवळ वेदना, उरला अबोला
दुरावा वाढल्यावर प्रेमही येते समेवर
असू दे,जर तिने थोडा बहुत धरला अबोला
२.
कशाला एवढे उडता मुलांनो
जरा शिस्तीमधे वागा मुलांनो
जरा ती हासली की फ्यूज जातो
हवा ही कोणती भरता मुलांनो
तिच्या धुंदीत जगते ती तरीही
तिच्यावर का उगा जळता मुलांनो
दुतर्फा मार्ग असतो प्रेम म्हणजे
नियम इतका तरी पाळा मुलांनो
नही आसाँ किसीसे इश्क़ करना
उगा मग मागुनी रडता मुलांनो
तिचाही तोल जातो त्या खळीवर
कितीना गोड हे हसता मुलांनो!
जरा थांबा पहा हिरवळ फुलांची
असे कायम कुठे पळता मुलांनो
खूप छान !!!
ReplyDeleteमस्त.. खुपचं छान अर्थपुर्ण गझल.
ReplyDelete